दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे किशोरी मेळावा संपन्न;

326

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी 
येथे किशोरी मेळावा संपन्न
दि:-०३/०१/२०२२ वार सोमवार रोजी दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी या दोन्ही शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  जयंती बालिका दिन निमित्त किशोरी मेळावा उत्साहात संपन्न झाला
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कु.पारूल  यादव तर प्रमुख पाहुण्या म्हणून कु.किरण भोसले  प्रमुख उपस्थिती म्हणून कु.पायल कानडे, कु.अंजली राऊत उपस्थित होत्या
क्रांतीज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमपूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मोहन (आण्णा) ठोंगे यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व्यासपीठावरील अध्यक्ष व प्रमुख पाहुण्या यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले इयत्ता १ ली ते १० वी मधील २० विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र व त्यांचे सामाजिक शैक्षणिक कार्य याची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीम. विलंबिनी पाटील मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले मुलींच्या आरोग्याच्या बाबत डॉ. भाग्यश्री शिंदे मॅडम यांनी सविस्तर चर्चा केली इ :-३री मधील विध्यार्थिनी कु. समृद्धी धोत्रे हिने “पिंगा गं पोरी पिंगा” या गीतावर अप्रतिम नृत्य सादर केले सदर कार्यक्रमाचे नियोजन श्रीम.संगीता काळे मॅडम, अरुणा मठपती मॅडम,विलंबिनी पाटील मॅडम यांनी केले तर त्यानां दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक श्री.सादिक बागवान सर,श्री. चंद्रकांत लोखंड सर यांचे मार्गदर्शन व श्री. युवराज जगताप सर, श्री. सुनील लंगोटे सर,श्री.मंगेश मोरे सर,श्री. सचिन काळे, श्री.राहुल ठोंगे ,श्री.संतोष ठोंबरे व सेवक श्री.संदीप भोरे यांचे सहकार्य लाभले
आनंदी वातावरणात मेळावा संपन्न झाला सूत्रसंचालन पाटील मॅडम यांनी केले व आभार संगीता काळे मॅडम यांनी मानले