क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा……

186

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा
अखिल भारतीय माळी महासंघ व क्रांती ज्योती माळी विकास संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी 22 रोजी महात्मा फुले मार्केट नागपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळ्या समोर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसूदन देशमुख होते. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गोविंद वैराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष कैलास तानकर, प्रदेश सचिव कैलास जामगडे उपस्थित होते. महानगर सरचिटणीस शिवराम गुरनुले आणि अनिल वर्हेकर, विजय सोनुले, गणेश कडुकार, गोविंद तितर, रत्नाकर शहाकर, मिलिंद पाचपोर, देवराव प्रधान विशेष उपस्थित होते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण व सुधाताई बनकर महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ. सुनिताताई शहाकार यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले. यावेळी अ.भा.माळी महासंघ नागपूर महिला अध्यक्षा मीनाताई बंड, कविता भोपळे, वृषाली ओम वैरागडे, पुष्पाताई वनकर, अलका कडुकार या उपस्थित होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवनपट व ह्यांनी स्त्री शिक्षण व समाज परिवर्तन बाबत केलेल्या कार्याबाबत प्रदेश कार्याध्यक्ष गोविंद वैराळे, कैलास तानकर, कैलास जामगडे, मधुसूदन देशमुख, वसुधाताई येनकर, सुनीताताई शहाकार, यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन विजय सोनुले यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवराम गुरनुले यांनी मानले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
Attachments area