
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर;
सेवासदन शिक्षण संस्था नागपुर पुरस्कृत विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा
सेवासदन संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी, सायंकाळी 5.30 वाजता. विदर्भस्तरीय रमाबाई रानडे स्मृती शिक्षण प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा संस्थेच्या उत्तर अंबाझरी मार्ग झाशी राणी मेट्रो स्टेशन सिताबर्डी नागपूर स्थित श्रीमती माई मोतलग सभागृहात वितरित करण्यात येणार आहे.
या वर्षी या पुरस्कारासाठी वर्धा जिल्ह्यातील रोठा येथील उमेद एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून परमपूज्य सद्गुरुदास महाराज तर अध्यक्ष म्हणून नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित राहतील. शिक्षक आमदार नागो गाणार यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

