
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर;
संपादकीय
नागपूर
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जय ज्योती पॅनलचा दणदणीत विजय
प्रा.अरुण पवार अध्यक्षपदी तर पहिल्यांदाच सरचिटणीसपदी रवींद्र अंबाडकर….
नागपूर : (दि.१ जानेवारी २२)
गुलाल उधळून विजयाचा जल्लोष करताना अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांच्यासह जय जोती पॅनलचे विजयी उमेदवार.
महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संस्थेचे अध्यक्ष अरुण पवार यांच्यासह जय जोती पॅनलच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. जय जोती पॅनलचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, कोषाध्यक्ष मुकेश घोळसे, सहचिटणीस रमेश राऊत अविरोध निवडून आले. अध्यक्षपदाचे उमेदवार अरुण पवार, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर तसेच राजेंद्र वाघे, नंदू कन्हेर, प्रकाश बोबडे, देवेंद्र काटे, डॉ.अभिजित पोतले, मोहित श्रीखंडे, राजेंद्र पाटील, सुनील चिमोटे, शरद चांदोरे, अजय गाडगे, प्रा.पंकज कुरळकर, सौ. शोभा लेकूरवाळे हे बारा सदस्य “जय जोती पॅनल चे” निवडून आले आहेत.
निवडणूक अधिकारी अँड.आर एस नाकतोडे यांनी कामकाज बघितले. निवडणूक शांततेत पार पडली. प्रा.अरुण पवार यांनी पॅनल च्यावतीने आभार मानले. गुरुवारी ३० डिसेंबरला मतदान घेण्यात आले होते. एकूण २८११ सदस्य मतदारांनी मतदान केले.

