अश्वघोष या पुस्तकाचे प्रकाशन ;

184

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर;

वीरेंद्र गणवीर लिखित मराठी नाट्य कृतीचा प्रकाशन सोहळा 
अश्वघोष या पुस्तकाचे प्रकाशन
नागपूर- १ / १ / २२
      भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष या वीरेंद्र गणवीर लिखित मराठी नाट्य कृतीचा प्रकाशन सोहळा रविवार 2 जानेवारी ला विदर्भ साहित्य संघाच्या सभागृह चौथ्या माळ्यावर  सायंकाळी 5 वाजता. आयोजित केलेला आहे. बोधी फाउंडेशन आणि बहुजन रंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार रहातील आणि नागपूरचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित . तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रमोद मुनघाटे, हिंदी विद्यापीठाचे डॉ. सतीश पावडे, बोधी फाऊंडेशनचे ललित खोब्रागडे यांचीही उपस्थिती राहणार . वीरेंद्र गणवीर लिखित अश्वघोष या पुस्तकाचे नाटक कार अशोक घोष यांचे जीवन व धम्म कार्यावर हे नाटक आधारित आहे. अश्वघोष भारतीय रंगभूमीचा उद्गागाताच नव्हे तर लेखक, गायक, संगीतकार, वाद्यकार, महाकाव्यकार, दिग्दर्शक, नेपथकार, नाटकाचा जनक अभिनेता असा सर्वव्यापी कलागुण संपन्न वेद पुराण ते बुद्ध धम्माचा तत्ववेत्ता म्हणून ख्याती असलेले विद्वान पंडित होते. या पुस्तकाचे प्रकाशन उद्या दोन जानेवारीला साहित्य संघात  असे म्हटले आहे. पत्रपरिषद संबोधित करतेवेळी बहुजन रंगभूमीच्या अध्यक्ष वीरेंद्र गणवीर सोबत अभिनेते आशिष दुर्गे आणि उत्कर्ष तायडे तसेच बोधी फाऊंडेशनचे ललित खोब्रागडे उपस्थित होते.