
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर;
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ललितकला विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी आणि अवबोध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूरकरांसाठी सेक्सपियर लिखित मॅकबेथ या मूळ इंग्रजी नाटकाचे हिंदी प्रयोग सादर करण्यात येत आहेत.
हे प्रयोग सलग तीन दिवस, म्हणजे ३ जानेवारी ते ५ जानेवारी या दरम्यान सायंकाळी 6.30 वाजता. ललितकला विभागाच्या पटांगणावर होणार असून हे नाटक ललित कला विभागाचे विद्यार्थी सादर करतील. आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना ललित कला विभाग प्रमुख डॉक्टर संयुक्त थोरात तसेच अवबोध फाऊंडेशनचे संस्थापक शार्दुल सोनोने यांची असून या नाटकाचे दिग्दर्शक पियुष धुमकेकर आणि हर्षद सालपे यांनी केलेले आहे. म्हणूनच नागपूरकरांनी या नाटकाचा आस्वाद नक्की घ्यावा असे आवाहन ललितकला विभाग व अवबोध फाउंडेशनच्या तर्फे पत्रपरिषदेत करण्यात आले आहे

