14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून !

141

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर

14 करोड रुपयाच्या आरोग्य सेवेसाठी लोकार्पीत अँम्ब्युलन्स धुळखात पडून !
चन्द्रपुर : आम आदमी पार्टी ने सोशल मिडिया च्या माध्यमातून  14 कोटिच्या एम्बुलेंस चा खुलासा केला आहे .मोठा गाजावाजा करत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या खनिज विकास निधीतून जिल्हा प्रशासनाला व्हेंटिलेटर युक्त सुसज्ज ॲम्बुलन्स चे 8,9 महिन्याआधी लोकार्पण केलेल्या अँम्ब्युलन्स Ambulance धुळखात पडुन असल्याचे चित्र दिसुन येत आहे. खनिज विकास निधिच्या 14 कोटि रूपयाच्या  38 अँम्ब्युलन्स खरेदी केल्या होत्या.
मात्र तेव्हापासुनच त्या नागपुर रोड वरील फोर्स कंपनीच्या मागील दारात धुळ खात पडुन आहेत. एकीकडे जिल्ह्यातील विविध हॉस्पिटल बाहेर एम्बुलेंस उपलब्ध नसल्यामुळे अनेक गरोदर माता व लहान बाळाचे मृत्यु होत आहे. तर दूसरी कड़े रुग्नाला इकडे तिकडे न्यावे लागले तर गरीबाना मोठी रक्कम मोजून खाजगी एम्बुलेंस करावी लागत आहे. या प्रकरणाबद्दल आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे तथा युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी संबंधित आरोग्य विभागाकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे विभागाकडून देण्यात आली. पण रुग्णसेवेसाठी 14 कोटि रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेल्या या अँम्ब्युलन्स उभ्याच राहणार असतील तर मग स्वताच्या फायद्यासाठीच हि सर्व खटाटोप आहे का असा प्रश्न आम आदमी पार्टी  उपस्थित करू लागली आहे. या वेळी सोशल मीडिया हेड राजेश चेटगुलवार,शहर सचिव राजू कूड़े, शहर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, निखिल बारसागड़े,सुजित चेटगुलवार तथा अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।