Home नागपूर संत शिरोमणी संताजींचे पालखी रथ यात्रेचे नागपुरात भव्य स्वागत…..

संत शिरोमणी संताजींचे पालखी रथ यात्रेचे नागपुरात भव्य स्वागत…..

0
संत शिरोमणी संताजींचे पालखी रथ यात्रेचे नागपुरात भव्य स्वागत…..

विदर्भ वेतन न्यूज पोर्टेल नागपूर

नागपूर. ३० डिसेंबर
संत शिरोमणी संताजींचे पालखी रथ यात्रेचे नागपुरात भव्य स्वागत…..
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा या राज्यस्तरीय संघटने तर्फे सुदुंबरे, पुणे येथिल समाधी स्थळापासून  समाजाचे दैवत श्री संताजी जगनाडे महाराज यांची रथयात्रा संत तुकारामाची गाथा, व संताजीच्या पादुका घेऊन ८ डिसेंबर पासून महासभेचे राज्य अध्यक्ष खासदार रामदास तडस यांचे नेतृत्वात राज्यभर गावोगावी फिरत असून रथयात्रा दि. 29/12/2021 ला नागपुरात दाखल झाली.
या रथयात्रेचे नागपुरातील महासभेचे राज्यसचिव व विदर्भ प्रभारी बळवंतराव मोरघडे, उपाध्यक्ष अनिल आस्टनकर, शंकरराव गायधनी, विनायक तुपकर, केशवानंद सुरकार, रमेश उमाटे, निखिल भुते, चंद्रभान मेहर, डॉ यशवंत खोब्रागडे, अजय धोपटे, महिला आघाडी अध्यक्ष सौ. नयनाताई झाडे, मंगलाताई मस्के, गीताताई येरणे, जयश्री गभने, भारती मोहिते, डॉ. रोशनी बारई, वंदना साठवणे, यांनी यांनी खूप परिश्रम करून स्वागताची तयारी केली व भव्य स्वागत केले. तुकडोजी चौकातून, भजन, दिंडी, रथ, व दुचाकी व चारचाकी वाहनासह शिस्तबद्दयतेणे कोरोनाचे निरबंधाचे पालन करीत, रघुजीनगर, सक्करदरा तिरंगा चौक, नंदनवन मेन रोड, मार्गे संताजी स्मारक, जगनाडे चौक, नंदनवन, येथे आणन्यात आली. तेथे दर्शन, व स्वागत करण्यासासाठी मोठया प्रमाणावर समाज बंधू भगिनी होत्या. प्रसंगी प्रामुख्याने, राज्य अध्यक्ष खा रामदास तडस, कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, राज्य महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, सहसचिव बळवंतराव मोरघडे, राज्य उपाध्यक्ष अनिल आस्तनकर, युवा अध्यक्ष कुणाल पडोळे, पालखी समनव्ययक श्री सुनील चौधरी, पालखी प्रमुख नरेंद्र चौधरी, युवा उपाध्यक्ष जगदीश वैद्य, विपीन पिसे, माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार टेकचंद सावरकर, आमदार मोहन मते, डॉ. यशवंत खोब्रागडे, उमेश शाहू, शेखर सावरबांधे, रमेशभाऊ गिरडे, बाबुराव वंजारी, स्वामी भद्रे, संजय शेंडे, प्रा. रमेश पिसे, ईश्वर बाळबुधे, राकेश भवाळकर, अनिल ढोबळे, राजेंद्र झाडे, देवेंद्र कालबांडे, डॉ देवमन कामडी, डॉ प्रभाकर खंडाईत, रमेश कोसुरकर, डॉ अशोक ढोबळे, प्रवीण बावनकुळे, अभय रेवतकर, विजय हटवार, आदी प्रामुख्याने हजर होते. वेगवेगळे जाती पोटजातीत, व गटा तटात विभागलेल्या समाजाला एकत्र जोडण्यासाठी, व ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी, या रथयात्रेचे महासभेतर्फे आयोजन करण्यात आले आहे.