
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर
दि:-२७/१२/२०२१ वार सोमवार रोजी दत्त प्राथमिक विदयामंदिरचे मुख्या. श्री.सादिक बागवान सर व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम. संगिता काळे मॅडम यांचे कडून प्रशालेस 40इंची स्मार्ट टी व्ही भेट देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती क्रिडा,शिक्षण व समाजसेवी संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष मा.श्री.मोहन (आण्णा)ठोंगे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.प्रशासनाधिकारी श्री. अनिलजी बनसोडे साहेब व पर्यवेक्षक मा.श्री.संजयजी पाटील साहेब उपस्थित होते
आपल्या मनोगतात बनसोडे साहेब म्हणाले आता शाळा प्रशस्त झाली आहे इमारत चांगली झाली आहे सर्व शिक्षक वृंद ही खूप कष्टाळू आहे स्कॉलरशिप साठी सर्वांनी प्रयत्न करावे विध्यार्थी गुणवत्ता यादीत आणावे ही अपेक्षा व्यक्त केली माझी वसुंधरा अंतर्गत शिक्षकांनी
उत्तम उपक्रम राबवल्या बद्दल संस्थेचे व सर्व शिक्षक शिक्षिका यांचे संजय पाटील साहेब व बनसोडे साहेब या दोघांनीही तोंड भरून कौतुक केले
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 40इंची स्मार्ट टी व्ही भेट म्हणून मा.श्री.मोहन(आण्णा)ठोंगे सर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला शाळेस सतत सहकार्य करणाऱ्या अरुणा मठपती मॅडम यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
अध्यक्षीय भाषणात ठोंगे सर म्हणाले की शिक्षकांचे सहकार्य उत्तम लाभत असून शाळेच्या प्रगतीचा आलेख माझे सर्व शिक्षक नक्कीच उंचावतील याची मला खात्री आहे शाळेस भेट दिलेल्या सादिक बागवान सर व संगीता काळे मॅडम यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले सूत्रसंचालन व आभार श्रीकांत कुंभारे सर यांनी मानले व कार्यक्रम उत्साहात पार पडला.

