ग्राहकांची लूट थांबविणे गरजेचे अँड.गौरी चांद्रायण:

325
विदर्भ वतन न्यूज पॉर्टल नागपुर
नागपूर: राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न...
आज जागोजागी ग्राहकांचे शोषण होत आहे. त्याकरीता आपणच सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे व समस्यांचा पाठपुरावाही तितकाच आवश्यक असल्याचे प्रतिपादन वीजवितरण कंपनीच्या ग्राहक सल्लागार अड.सौ.गौरी चाद्रांयण यानी अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलतांना व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे क्षेत्रीय संघटनमंत्री गजानन पांडे. प्रांत अध्यक्ष सौ.स्मिता देशपांडे, प्रात सचिव संजय धर्माधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलतांना सौ चांद्रायण यांनी कार्यकर्त्यांनी अभ्यासोनी प्रकटावे प्रकोटोनी बोलावे याचा वापर होणे गरजेचे असून त्याकरिता संघटनात्मक बाधनी व त्याचा पाया मजबूत असावा. आजकालच्या मोठमोठया सेलीबेटीकडून होणाऱ्या भ्रामक जाहीराती व त्यातून फसवणूक टाळण्याकरीता नुकताच पूर्णपणे नवीन स्वरुपात अमलात आलेला ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदींचा वापरही तितकाच केला पाहीजे. या कायदयात मध्यस्थामार्फत समस्यांचे निवारण करण्यास जर यश आले तर मोठया प्रमाणात जिल्हा ग्राहक आयोग, राज्य आयोग व राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडील प्रलंबित प्रकरणाचा निपटारा होऊ शकेल याचे चितन व्हावे. याप्रसंगी क्षेत्रीय संघटन मंत्री गजानन पांडे यांनी गांव तेथे ग्राहक पंचायत, मोहल्ला तेथे ग्राहक पंचायत व सदस्यता अभियान जागृतीकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रांत अध्यक्षांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांत सचिव संजय धर्माधिकारीनी केले कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भुजाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन नरेंद्र कळकर्णी यांनी केले. याप्रसंगी अड. विलास भोसकर, श्रीपाद हरदास, सौ. तुप्ती आकांत, अँड वृषाली प्रधान, अड. केतन भोसकर, जीवन झाडे, उदय दिवे, अरविंद हाडे यांचेसह अन्य गणमान्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.