
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर
हल्दीरामला म
नागपुर दि: २४ डिसेंबर
महाराष्ट्र राज्य अस्मितेचा विजय..
मा.राजसाहेबांचे प्रखर महाराष्ट्र धर्म प्रेम आणि त्यांच्या विचाराने प्रेरित महिला आघाडीच्या मनसैनिक ह्यांच्या आंदोलनाला यश!
नागपूर येथील हल्दीराम (मेडिकल चौक) स्वीट ह्या विक्री केंद्रावर मराठी भाषेचा वापर न करता इंग्रजी भाषेचा वापर करून राज्यभाषा मराठीचा अवमान होत आहे. हे निदर्शनास येताच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना नागपूर शहर महिला आघाडीच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष अचलाताई मेसन, महिला शहर अध्यक्षा सौ.मनीषा पापडकर ह्यांच्या नेतृत्वात सर्व महिला आघाडीच्या मंसैनिकानी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदविला. संबंधितांना तसे निवेदन देण्यात आले. शेवटी मनसेच्या प्रयत्नांना यश आले आणि हल्दीराम विक्रेता व्यावसायिकाने लवकरच मराठी भाषेचा वापर करण्याचे मान्य करून लेखी पत्र दिले व नागपूरमध्ये सर्व हल्दीराम प्रतिष्ठानमध्ये मराठी पाट्या लागणार व मराठी भाषेचा मान सन्मान होणार असे आश्वासन व्यवस्थापक यांनी दिले. हल्दीराम प्रतिष्ठानमध्ये जबरदस्त बंदोबस्त पोलिसांतर्फे लावण्यात आलेला होता. पोलिसांनी सुद्धा आम्हाला मोलाचे सहकार्य केले व या यशामध्ये आमच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अचला मेसन,शहराध्यक्ष सौ. मनीषाताई पापडकर अर्चनाताई कडू (शहर सचिव) मंजुषाताई पानबुडे (विभाग अध्यक्ष दक्षिण) मनीषा पराड (जनहित कक्ष) वैशाली फुलझेले विभाग उपाध्यक्ष पश्चिम बोरकुटे, अनु सहारे, सुनिता महाराष्ट्र सैनिक राज बहिर नागपूर शहरामधील सर्वच मनसैनिक महिला आघाडीतील कार्यकर्त्यांचे मनसे अभिनंदन !
ह्या सर्व प्रक्रियेमध्ये स्थानिक पोलिस प्रशासनाने सुद्धा मोलाचे सहकार्य लाभले.
आपली नम्र,
सौ मनीषा पापडकर
शहर अध्यक्ष महिला सेना नागपुर
हिला सेनेचा आक्रमक दणका..

