आदिवासी गोवारी जमातीचा विदर्भस्तरीय भव्य मेळावा 26 डिसेंबर ला

192
विदर्भ वतन न्यूज पोर्टल
स्वतंत्र भारताच्या इतिहासात सलग ७४ वर्ष कायम उपेक्षित व अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी जमातीने आपल्या संविधानिक न्याय हक्क व अधिकारांसाठी निरंतर लढा दिला. परंतू कायम सत्ताधारी प्रस्थापितांनी काही शुल्लक प्रशासकीय शाब्दिक चुकांचा बाहू करत आदिवासी गोवारी जमातीला त्यांच्या हक्क व अधिकारांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले. कांग्रेस व भाजपा या दोन्ही प्रस्थापित पक्षांनी आळीपाळीने केंद्रात व राज्यात सत्ता भोगत कायम आदिवासी गोवारी समाजाचा फक्त मतांसाठी राजनितिक उपयोग करत समाजाची राजकीय फसवणूक केली.
२३ नोव्हेंबर १९९४ साली नागपूर येथे जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ति झाली. महाराष्ट्राच्या विधानसभेवर मोर्चा काढत शांतिपूर्ण आंदोलन करतांना ११४ निष्पाप आदिवासी गोवारी बांधव शहिद झाले. परंतू त्यानंतरही २७ वर्षात ह्या असंवेदनशिल राजकारण्यांनी आपल्याला न्याय दिला नाही. त्याही वेळेला फक्त बाळासाहेब आंबेडकर हे प्रखरपणे आदिवासी गोवारी जमातीच्या पाठीशी खंबिरपणे उभे होते. व भारिप च्या एकमेव तात्कालीन आमदाराचा त्यांनी राजीनामा दिला. व आजही उपेक्षित अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी जमातीच्या न्यायासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर निरंतरपणे धडपडत आहेत. या सर्व बाबींवर विचार मंथन करण्यासाठी रविवार, २६ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे अन्यायग्रस्त आदिवासी गोवारी जमातीचा विदर्भस्तरीय भव्य मेळावा आयोजित केलेला आहे.  बाळासाहेब आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा विदर्भातील आदिवासी गोवारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
पत्रपरिषद संबोधित करतेवेळी गोवारी समाजाचे नेते भगवान भोंडे, अरविंद सांदेकर, रमेश गजबे ,रविभाऊ शेंडे, लक्ष्मणजी बागडे, सुरेश नेवारे, अंकुश मोहिले यांची उपस्थिती होती.