संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी रथयात्रा

181


 
विदर्भ वतन समाचार नागपुर
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभे तर्फे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पालखी रथयात्रा तेली समाज जोडो व ओबीसी जागृती अभियान 29 डिसेंबरला नागपूर शहरात दर्शन व स्वागत सोहळा ओबीसी घटकात येणारा तेली समाज महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर असून विविध पोटजाती व गटागटामध्ये विखुरलेल्या तेली समाजाला संघटित करण्यासाठी ‘‘समाज जोडो अभियान ’’ आणि वर्तमान स्थितीत ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘‘ओबीसी जागृती अभियान’’राज्यभर राबविण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम यांची गाथा लिहून जगाला त्याची ओळख करून देणारे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पालखी रथयात्रा ‘‘सुदंबरे’’ येथून दि.8 डिसेंबर 2021 ला राज्य अध्यक्ष मा.खा. रामदासजी तडस यांचे नेतृत्वात व त्यांचे हस्ते उद्घाटित होऊन सुरू झाली. ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरून तेली समाजाला संघटित करणार आहे. यायात्रेत कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, महासचिव डाॅ.भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजूनाना शेलार, सहसचिव बळवंत मोरघडे, सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाळे, रथयात्रा समन्वयक सुनील चैधरी, युवा आघाडी राज्य महासचिव नरेन्द्र चैधरी व मोठया प्रमाणावर पदाधिकारी समाज बंधू-भनिनी राहणार आहेत. विविध जिल्ह्याचा प्रवास करून ही रथयात्रा दि. 27 डिसेंबर 2021 ला उमरेड मार्गे नागपूर जिल्ह्यात प्रवास करणार असून या यात्रेचे दिंडी, भजन, ढोलताशा वाजवून दिंडी काढून संपूर्ण जिल्ह्यात या रथयात्रेचे स्वागत होणार असून. यासाठी समाज बांधव-भगिनी उत्साहीत झालेले असून समाजामध्ये चैतन्याचे वातावरण आहे. 27 डिसेंबर उमरेडला सायंकाळी 5 वा. उमरेड येथे युवा आघाडी उपाध्यक्ष जगदीश वैद्य व जिल्हाध्यक्ष पुष्कर डांगरे यांचे नेतृत्वात मान्यवरांचे उपस्थितीत रथयात्रेचे स्वागत व दर्शन सोहळा आयोजीत केलेला आहे. हि रथरात्रा उमरेड वरून सिल्ली-कुही-मौदा-रामटेक -कन्हान-कामठी मार्गे रात्री नागपूरला येवून रविभवन नागपूर येथे मुक्काम राहील. रथयात्रा मार्गातील गावांमध्ये या रथयात्रेचे स्वागत व दर्शन समाज बांधव करणार आहेत. बुधवार दि. 29 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ८ वाजता. नागपूर शहरात या रथयात्रेचा स्वागत व दर्शन सोहळा संताजी जगनाडे चैक,नागपूर येथे घेण्यात होईल. सकाळी ७ वा. तुकडोजी चैकातून भजन, दिंडी, ढोल ताशासह रथयात्रा रघुजीनगर, सक्करदरा चैक, तिरंगा चैक, नंदनवन मेनरोड, मार्ग-जगनाडे चैकात पोहचेल. जगनाडे स्मारक चैक नंदनवन येथे आयोजीत या स्वागतदर्शन सोहळयाचे अध्यक्षस्थानी राज्यध्यक्ष खा.रामदासजी तडस, तर उद्घाटक म्हणून माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री नितीनजी रा़ऊत मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून आमदार चंद्रशेखर बावणकुळे, आ.कृष्णाभाऊ खोपडे, आ.अड अभिजीत वंजारी, आ.टेकचंद सावरकर, आ.मोहन मते, विशेष निमंत्रीत असून मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून कोषाध्यक्ष अशोककाका व्यवहारे, महासचिव डाॅ.भूषन कर्डिले, कोषाध्यक्ष गजूनाना शेलार, उपाध्यक्ष अनिल आष्टनकर आणि नागपूरातील सर्व समाज संघटनाचे पदाधिकारी सर्वश्री रमेश गिरडे, बाबुराव वंजारी, शंकररावजी भुते, उमेश शाहू ,हिरामनजी बावनकुळे, उपमहापौर मनिषाताई धावडे, शेखरभाऊ सावरबांधे, ईश्वर बाळबुधे, प्रा.रमेश पिसे,सुभाष घाटे, विनोद टिकले, स्वामी भद्रे, संजय शेंडे, प्रा.राजेन्द्र झाडे, डाॅ.यशवंत खोब्रागडे, कुणाल पडोळे, विनायक तुपकर, केशवानंद सुरकार, अतुल वादिंले, जगदिश वैद्य, विपीन पिसे, संकेत बावनकुळे, प्रशांत ईखार, प्रा.किशोर वरभे, प्राचार्य देवेन्द्र काळबांडे, प्रा.रविन्द्र येनुरकर उपस्थित राहतील. या सोहळा समारंभाचे आयोजक राज्य सहसचिव व विदर्भ प्रभारी बळवंतराव मोरघडे असून त्यांचे नेतृत्वात नागपूर विभाग महिला अध्यक्ष नयनाताई झाडे, शहरअध्यक्ष शंकरराव गायधनी, युवाअध्यक्ष निखील भुते, शहर महिला अध्यक्षा सौ. मंगलाताई मस्के, ग्रामीण महिला अध्यक्षा मंजूताई कारेमोरे, प्रांतिक पदाधिकारी सर्वश्री. रमेशभाऊ उमाटे,दिलीप अवचट, डाॅ.देवमन कामडी, लता होलगरे, जयश्री गभने, डाॅ.अशोक ढोबळे,चंद्रभान मेहर, रोशनी बारई, अरूण झाडे, डाॅ.प्रभाकर खंडाईत, अनिल पेटकर, प्रा.अभय रेवतकर, निताताई वंजारी, रंजना भावाळकर, अभिनय लोखंडे, निलीमा घाटोळे, सुषमा नासरे, मिनाताई लेंडे,स्वाती ढोबळे, सुप्रिया जिभकाटे, मंगला महाजन, सारीका ताटे, वर्षा बारई, गिता येरणे, वंदना साठवणे, कल्पना जोगे, सविता कुल्लरकर, भारती मोहीत, मनिषा झाडे,सोनाली घोडमारे, बेबीनंदा जैस आणि समाजाच्या विविध संघटना-उंच माझा झोका, अखिल तेली महिला समाज संताजी महिला मंच, घे भरारी, महिला तेली समाज संघटना यांचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने या समारंभाची तयारी करीत आहेत. तरी तेली समाजातील जिल्ह्याचे ग्रामीण भागातील व नागपूर  शहरातील तेली समाजाच्या सर्व संघटना व संस्थाचे पदाधिकारी व सदस्य बंधू-भगिनींनी संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे पालखी रथ यात्रेचे आप आपल्या भागात जोरदार स्वागत करून दर्शनाचा लाभ घ्यावा. आयोजक समितीचे प्रमुख व प्रांतिक सहसचिव, विदर्भ प्रभारी बळवंतराव मोरघडे व समितीचे सर्व सदस्यांनी विनंती केली आहे.
कृपया वरील बातमी संताजी महाराजांचे फोटोसह आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिध्द करावी.
बळवंतराव मोरघडे
राज्यसहसचिव तथा विदर्भ प्रभारी प्रमुख आयोजक समिती