Home नागपूर ढिवर समाज महिला संघटनेचे येत्या 24 डिसेंबर ला उपवर वधू-वर परिचय मेळाव्याचे...

ढिवर समाज महिला संघटनेचे येत्या 24 डिसेंबर ला उपवर वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

181 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपूर: ढिवर व तत्सम समाजातील विद्यार्थ्यांचा, समाज कार्यकर्त्यांचा, लोकप्रतिनिधींचा सत्कार आणि उपवर वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन आदिवासी ढिवर समाज महिला संघटनेच्या वतीने येत्या 24 डिसेंबर रोजी, सकाळी 10 ते 5 या दरम्यान आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम गुरुदेव सेवा आश्रम शुक्रवारी तलावाजवळ, आग्याराम देवी चौक, नागपूर येथे या उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुखदेवभाऊ मेश्राम (आदिवासी ढिवर समाज संघटनेचे मार्गदर्शक) यांची प्रामुख्याने उपस्थिती राहतील. आणि कार्यक्रमाचे उट्घाटक अँड. नीरज खांदेवाले (विधीतज्ञ) नागपूर यांच्या हस्ते होणार आहे. ढिवर महिला समाज संघटनेच्या अध्यक्षा सौ.वनिता मनोज नगरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम असून यावेळी रश्मी नान्हे, रूपा दिघोरे, भारती नान्हे, दुर्गा शिवरकर, सुनंदा उके, रेखा चाचेरकर, शिला नान्हे, महानंदा शिवरकर, विजयाताई करनुके आणि नंदाबाई शिवरकर यांनी खूप परिश्रम घेतलेत. आदिवासी ढिवर समाजाच्या महिला व सर्व पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थिती राहतील. आदिवासी महिला संघटनेच्या वतीने समाजातील आदिवासी समाजातील ढिवर व तत्सम मच्छीमार समाजातील उत्तम गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा, समाज कार्यकर्त्यांचा, लोकप्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात येईल. तसेच उपवर वधु-वर परिचय मेळावा असून आदिवासी ढिवर समाजातील बांधवांनी इयत्ता १० व १२ वी, पदवीधर या परीक्षेत 2019 व 20 आणि 20-21 यावर्षी गुणवंतविद्यार्थी  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी या आदिवासी मेळाव्यात आपली नोंद करून प्रतिनिधीकडे संपर्क साधावा. असे म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्यांनी नोंद केली त्या व्यक्तींनी आपल्यासोबत पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो व संपूर्ण बायोडाटा सोबत आणावा. आणि समाज बांधवांनी आपला कार्यक्रम समजून मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन अध्यक्षा सौ.वनिता मनोज नगरेंनी केले आहे. आयोजित कार्यक्रमात आदिवासी ढिवर समाज बांधवांनी सहभाग घेऊन कोरोना महामारीला लक्षात ठेवून आपल्या तोंडावरील मास्क लावावे व सोशल डिस्टिंक्शन चे पालन करावे या आदेशाचे पालन करावे. ही विनंती केली आहे.