नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या आजपासून शाळेला सुरुवात

160
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – नागपूर महापालिका क्षेत्रातील इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या आजपासून शाळा उघडण्यात आले आहेत़ मनपा आयुक्त राधाकृष्णन बी़ यांनी आदेश बुधवारी जारी करण्यात आले़
कोरोनाचा नवीन विषाणू ओमायक्राँनचा प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता पहिली ते सातीवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यासाठी आयुक्तांनी १५ डिसेंबरपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास स्थगिती दिली होती़ कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन यासंबंधीचे नवीन आदेश जारी केले आहेत़ महाराष्ट्र शासनाने याआधी १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यासदर्भात सूचना दिली होती़ मात्र मनपा आयुक्तांनी नवीन कोरोना व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन या वर्गातील शाळा सुरु करण्याला स्थगिती दिली होती़ आयुक्तांनी हा निर्णय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार घेतला होता सुधारित आदेशात शाळा सुरु करण्याला परवानगी देताना कोविड नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत़ मनपा क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग आधीच सुरु आहेत़