Home चंद्रपूर गुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

गुरुवारी होणार जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यीकरणाचे भूमिपूजन

36 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

चंद्रपूर  : चंद्रपूर रेल्वे स्थानक गेटसमोर चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने जननायक बिरसा मुंडा चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, त्याचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, दिनांक 16 डिसेंबर रोजी माजी अर्थमंत्री, लोकलेखा समितीचे अध्यक्ष, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जननायक बिरसा मुंडा चौक सौंदर्यकरण करण्यासाठी आदिवासी समाजबांधवांसह नगरसेविकानी मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेस्थानक गेटसमोर शासकीय जागेवर सौंदर्यीकरण करण्यासाठी मनपाने मंजुरी प्रदान केली. या उद्या गुरुवारी भूमिपूजन सोहळा होणार असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.