कसे जगावे (भावगीत)

246
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
       कसे जगावे
शुभ्र धवल कपाशी प्रमाणे 
तेजपुंज प्रामाणिक असावे
नको कोणताही कलंक अंगी
साधे परी निष्कलंक जगावे    ।।धृ।।
सुगंधास असे पेरीत जावे, 
आयुष्य हे सारे चंदन व्हावे
गेलो अंतास राख होऊनि
परी किर्तीरूपे मागे उरावे
देह मानवाचा आहे हा जरी
रूप ईश्वराचे त्यात दिसावे…..।।१।।
दुःख दिनाचे जाणुनी अंतरी
हात मदतीचा असावा वरी
द्यावा सुखाचा थंडावा तयासी
हीच आहे माणुसकी हो खरी
जागा देहातील प्राण करुनि
थोडे माणुसकीस जागे करावे ….।।२।।
खोटे,अधर्म द्यावी तिलांजली
धरू सत्याची खडतर वाट
येवो कितीही संकटे धावून
सर करावा जीवनाचा घाट
शांत संयमाने देऊन तोंड
सत्य वाचनास बाध्य रहावे…..।।३।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता:-बार्शी
     जिल्हा:- सोलापूर
       8275171227