कॅन्सरग्रस्त निराधार म्हातारीने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून केली जीवन यात्रा संपण्याची याचना

162
   विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर 
  • हृदय पिळवुन टाकणारी व माणुसकीला काळिमा फासणारी घटना

नागपुर/कुही – कुही पाचगाव येथील म्हातारी इंदिराबाई हटवार वय वर्ष 80 या वृद्ध महिला या महिलेला कर्करोगासारख्या गंभीर आजार झाला असून अतिशय भयावह परिस्थितीमध्ये तिचा मृत्युशी संघर्ष सुरू आहे. तिने आपली संपत्ती मुलाच्या नावे केल्यानंतर मुलांनी तिला वाऱ्यावर सोडून दिले व तिची देखभाल करण्यास स्पष्ट नकार दिला या म्हातारीची शारीरिक अवस्था इतकी वाईट आहे की स्वतःच्या पायावर उभे होता येत नाही, चालता सुद्धा येत नाही, तिच्या कुटुंबियाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे अमानवीय व्यवहारामुळे कर्करोगाची झ्तकी वाढली आहे की आता दुर्गंध यायला लागला आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये तिच्या व औषधोपचार करणे तर दूरच साधे जेवण करिता व कपडे सुद्धा मिळत नाही. तीला मारण्यासाठी घरापासून लांब ठेवले आहे म्हणून त्रासाबद्दल आपल्या नातवाला राजेशला ही माहिती दिली. या संदर्भात पोलिस स्टेशन कुही येथील दि. १४ नोव्हेंबर २१ ला तक्रार दिली परंतु पोलिसांनी काहीही यावर कारवाई केलेली नाही. पाचगाव येथील म्हातारी इंदिराबाई हटवार म्हातारीला 5 मुलं आहे. पाचही मुलांनी तिच्याकडे कानाडोळा केला असून उलट तिची दहा ते पंधरा एकर जमीन शेती तिच्यावर नावावर असून पाचही मुलांनी आपल्या नावावर केलेली आहे आणि म्हातारीला बेदखल केलेला आहे तसेच एक मुलगी आहे त्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू त्या आधीची सेवा करत आहे त्या म्हातारीची मृत्युशी झुंज चालू असूनआता ती नागपुरात धंतोली येथे जीवन छाया केअर सेंटर येथे उपचार घेत आहे. पण प्रकृती अतिशय नाजूक आहे या प्रकरणात आजीच्या नातवाने माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेतला असून त्याला शिवागीळ करण्यात आली मातारी च्या लहान मुलाने (अंकुश हटवार) राजेशला मारण्याची धमकी सुद्धा दिली परंतु म्हातारीची काळजी घेतली नाही. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषद मध्ये राजेश बावनकुळे यांनी केली. पत्रपरिषद संबोधित करतेवेळी राजेश बावनकुळे आजीचा नातू सोबत रमेश दादा वाटकर, धनंजय इंगोले, चंद्रकांत बावनकुळेविनोद सिंग विनोद सिंगुमारे आणि लक्ष्मण वैरागडे यांची मंचावर उपस्थिती होती.