अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक, विद्यार्थी ठार

263
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – आपल्या बहीण व मैत्रिणीला घेऊन जात असताना अज्ञान वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकी चालक तरुण विद्यार्थी जागीच ठार झाला़ सुनील मांढरे (रा़ भर्रेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे़ ़ देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील १२ वीतील विद्यार्थी सुनील मांढरे हा बहीण व मैत्रिणीसोबत देवरी तालुक्यातील भर्रेगाव परिसरातून येत असताना, महामार्गावर अज्ञान वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ यामध्ये सुनील जागीच ठार झाला, तर बहीण व मैत्रीण गंभीर जखमी झाले़ शुक्रवारी (दि़ १०) सकाळी घडलेल्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी येथ हलविण्यात आले आहे़