Home नागपूर इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती –...

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यास पुन्हा १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती – मनपा आयुक्त राधाकृष्णन् बी

122 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपुर कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे संकट बघता शहरातील शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला़ महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी़ यांनी  कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश १५ डिसेंबरनंतर काढण्यात येतील़ असे स्पष्ट केले़ आठवी ते बारावीपर्यंत वर्ग यापूर्वीच सुरु करण्यात आले आहे़
राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ परंतु, ओमिक्रॉनचे  संकट बघता आयुक्त राधाकृष्णन बी़ यांनी १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला होता़ आज त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्ग सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलला़ शहरात दररोज वाढणारे कोरोनाबाधित तसेच ओमिक्रॉनचे संकट आहे़ शहरातील शाळांबाबत निर्णय घेण्याचे अधिकारी राज्य सरकारने आयुक्तांना दिले आहे़ आयुक्तांनी शहरातील शाळांबाबतचे आदेश १५ डिसेंबरला आढावा घेतल्यानंतर काढण्यात येणार आहे़ पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन होणार आहेत़ ओमिक्रॉनच्या पार्श्र्वभूमिवर आयुक्तांना नागरिकांना कोविड नियमांचे पालन करणे, घराबाहेर पडताना मास्क, सतत सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे़