Home Breaking News विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक, कोण मारणार बाजी?

विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक, कोण मारणार बाजी?

0
विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक, कोण मारणार बाजी?
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे़ सुरुवातीपासूनच विविध मुद्द्यांमुळे चर्चेत असलेल्या या निवडणुकीत मतदानाच्या पुर्वसंध्येपर्यंत ‘सस्पेन्स’ कायम राहिला़ एकीकडे भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी पक्षाने सर्व मतदारांना ‘सेफहाऊस’ मध्ये ठेवले असून, दुसरीकडे काँगे्रसकडून मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपमधून आयात करण्यात आलेले रविंद्र भोयर यांच्याऐवजी अपक्ष मंगेश देखमुख यांना समर्थन दिले़ ऐनवेळी झालेल्या या बदलामुळे मतदानाच्या वेळी नेमके कुणाच्या पारड्यात कुठली मतं जातात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे़ दरम्यान, निवडणुकीत ५५९ मतदार असून तीन १५ मतदान केंद्रांवर मतदान होईल़
नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र व ग्रामीण भागातील १२ अशा एकूण १५ केंद्रांवर मतदान होणार आहे़ मतदानाला एक दिवस शिल्लक असताना काँगे्रस व भाजपकडून सावध पवित्रा घेण्यात आला़ भाजपने मतदार विरोधकांकडे वळू नयेत यासाठी नगरसेवकांना विविध ठिकाणी सहलीला पाठविले होते़ यातील बहुतांश नगरसेवक बुधवारी परतले़ मात्र नागपुरात परतल्यानंतर सर्वांची रवानगी पेंच येथील ‘रिसॉर्ट’ वर करण्यात आली़ मतदानाच्या दिवशी सर्व नगरसेवक थेट मतदान केंद्रांवर येणार आहेत़ नगरसेवक कुणाच्याही संपर्कात येऊ नयेत यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत पदाधिका-यांची त्यांच्यावर नजर राहणार आहे़ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी मतदारांना मतदान नेमके कसे करायचे व पसंतीक्रम कसा भरायचा, मत अवैध ठरु नये यासाठी नेमक्या कुठल्या चुका टाळायच्या याबाबत रिसाँर्ट मध्ये मार्गदर्शन करण्यात आले़
या निवडणुकीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या आहे़ प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहे़ स्कॅनरमध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे़
सर्व केंद्रावर सॅनिटायझर थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे़

नागपूर महानगरपालिका : ११५
जिल्हा परिषद: ७०
नगरपरिषद व नगरपंचायत : ३३४