
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपुर – नागपूर येथील पेट्रोल पंपावर महिला कर्मचा-यांनी एका महिलेला जबरदस्त मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे़ मेडिकल चौकात ही घटना घडली कपड्यावर थेंब उडाल्यावरुन त्यांच्यात वाद निर्माण झाले असून एकमेंकींनमध्ये मारहाण झाली़ बुधवारी दुपारी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ शोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे़ मेडिकल चौकातील पेट्रोल पंपावर बुधवारी दुपारी दुचाकीचालक महिला पेट्रोल घेण्यासाठी आली होती़ पंपावरील कर्मचा-याच्या हातून चुकून हॅन्डल मागेपुढे झाल्याने तिच्या कपड्यावर पेट्रोलचे शिंतोडे उडाले़ त्यामुळे ही महिला संतापली़ तिने पुरुष कर्मचा-यासोबत असभ्य बोल केले़ त्याने विरोध केला असता बाजूचा कच-याचा मोठा डब्बा उचलला आणि पुरुष कर्मचा-याला फेकून मारला़ ते पाहून तिथल्या महिला कर्मचा-यांनी तिला आवरण्याचा प्रयत्न केला असता भाईगिरी करणा-या महिलेने त्यांच्याशीही असभ्य बोल केले़ त्यामुळे संतापलेल्या तीन कर्मचारी महिलांनी तिला बेदम मारहाण केले़ याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर झाला असून तो खुपच व्हायरल होत आहे़ यानिमित्त पेट्रोल दरवाढीचा परिणाम असाही़ असे म्हणत वेगवेगळ्या गमतीशीर चर्चाही जोरात सुरु आहे़ या संपुर्ण घटना घडल्यावर इमामवाडा पोलिस तेथे पोहचले़ त्यांनी दोन्हीकडची बाजू ऐकून घेतल्यानंतर ‘अदखलपात्र’ अशी नोंद केली़ महिलेच्या कुटुंबीयांना ठाण्यात बोलवून तिला समज दिल्यानंतर तिला कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले़

