ग.दि.माडगूळकर यांची माफी मागून नाच रे मोरा चे विडंबन काव्य

209
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
थांब रे पावसा, आकाशी ढगात
थांब रे पावसा,थांब…..
तुडुंब नद्या नाले वाहिले रे
तळी सारी तुडुंब भरली रे
पिकं झाली पिवळी ,
गेला त्यांचा बळी
खूप सोसला तुझा मार
थांब रे पावसा, आकाशी ढगात
थांब रे पावसा,थांब…..
शेतं सारी तळी बनली रे
पिकांची मुळं कुजली रे
किती पडला अति,
केली आमची माती
झाले नुकसान हे अपार
थांब रे पावसा, आकाशी ढगात
थांब रे पावसा,थांब…..
घर,गुर सारी वाहिली रे
तुझी अवकृपा पाहिली रे
बस झाला थाट,
लावली सारी वाट
नको नकोशी झाली तुझी धार
थांब रे पावसा, आकाशी ढगात
थांब रे पावसा,थांब…..
धो धो अती तू पडला रे
शेतकऱ्यांशी खूपच नडला रे
बस कर आता ,
शांत ठेव माथा
हो इथून तू हद्दपार
थांब रे पावसा, आकाशी ढगात
थांब रे पावसा,थांब…..
श्री.युवराज गोवर्धन जगताप
     काटेगाव ता:-बार्शी
     जिल्हा:- सोलापूर
       8275171227