सालेकासा पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या महिला पोलिस कर्मचा-यांची गळफास लावून आत्महत्या

400
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पोलिस स्टेशन सालेकसा येथील कार्यरत महिला पोलिस कर्मचारी ज्योती बघेल (वय, २८ वर्ष) नी आपल्या घरी गडफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ माजली़ ज्योती बघेल आणि तिचे पती रमेश गिरिया हे दोन्ही पोलीस विभागात सालेकसा येथे कार्यरत आहेत़ ज्योती सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये तर रमेश सी़ ६०, पथकात कार्यरत आहेत़ सकाळी दोन्ही आप आपल्या ड्युटी वर गेले होते़ मात्र ज्योती पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पुन्हा आपल्या घरी आली़ आणि काही वेळांनंतर तिने गळफास लावल्याचे दिसून आले़ याविषयी सालेकसा पोलिसांना माहिती मिळताच लगेच ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र डॉक्टरांनी गंभीर परिस्थिती पाहता गोंदिया येथे रेफर करण्यात सांगितले त्यानंतर तिला गोंदिया येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला तपास करीत मृत घोषित केले़ उच्च स्तरीय तपासणीसाठी मृतदेह गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले़ ज्योती ने आत्महत्या का केली? हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे़ सालेकसा पोलिस सर्व बाजूने तपास करीत आहे़