कोरोनाची १९ रुग्णांची नोंद, कुटुंबातील ९ जणांचा समावेश

187
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – कोरोनाच्या शांत झालेल्या वातावरनात चार महिन्यानंतर पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाचे १९ रुग्णांची नोंद झाली़ यात शिवाजीनगरातील एकाच कुटुबांतील ९ जणांचा समावेश आहे़ एवढ्या मोठयासंंख्येत रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे़ मंगळवारी १९ रुग्णांची नोंद झाली़ यात शहरातील १६ रूग्ण असून ग्रामीणमधील २ तर १ जिल्ह्याबाहेरील आहे़ आज नागपूर जिल्ह्यात २९४१ तपासण्या झाल्या़ पॉझिटिव्हीटीचा दर ०़६ टक्के आहे़ मागील २५ दिवसांपासून मृत्यूची नोंद नाही़ मात्र, कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ८१ झाली आहे़ यातील रुग्ण शहरातील, १६ रुण ग्रामीणमधील तर ३ रुग्ण जिल्हाबाहेरील आहेत़
महानगरपालिके ने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून ३० जण हैद्राबाद येथे लग्नाला गेले होते़ यातील शिवाजीनगरातील ९ जणांचा समावेश होता़ याच लग्नातून त्यांना लागण झाली असावी़ नागपुरात आल्यावर त्यांनी तपासणी केल्यावर सर्वच पॉझिटिव्ह आले़ या सर्वांवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत़ नागपुरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे़