कोट्यवधीं किमतीच्या जमीनवर नगरसेवकाचा कब्जा करण्याच्या प्रयत्न, रक्षकाला केली मारहाण

156
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – नगरसेवक कमलेश चौधरी आणि त्यांच्या गुंडांनी हजारीपहाडमधील कोट्यवधींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. विरोध करणा-या तेथील सुरक्षा रक्षकाला  मारहाण केली़ रविवारी दुपारी  घडलेल्या या घटनेमुळे परसिरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता़ प्रकाश खुपचंद जैन (वय ७३, रा़ धंतोली) हे व्यावसायिक आहेत़ मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी १९९० ला जैन यांनी गिट्टीखदानमधी हजारी पहाड भागात गेंदलाल खडगी आणि रामभाऊ खडगी यांच्याकडून जमीन विकत घेतली होती़ पोलिसांकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, तेव्हापासून त्या जमिनीवर जैन यांचा ताबा आहे़ सभोवताल वॉल कंपाउंड टाकले असून चारही बाजुला गेट लावून सुरक्षा रक्षक ठेवले आहे़ गेल्या काही दिवसांपासून या जमिनीवर काही समाजकंटकांची नजर गेली आहे़ जैन यांची ही जमीन हडपण्यासाठी काही भूमाफियांनी वेगवेगळी डावबाजीही केली आहे़ मात्र,कागद पत्रांच्या पुरावा असल्याने त्यांचा हा डाव वेळोवेळी फेल झाले काही समाजसंकट धमक्या देऊन ही जमिन हडपण्याच्या प्रयत्नात आहेत़ रविवारी दुपारी अभिजीत समर्थ नामक सुरक्षा रक्षकाने फोन करुन जैन यांना माहिती दिली की आरोपी कमलेश चौधरी (वय ३५), राजू माटे आणि सारिका चौहान (रा़ सर्व फे्रण्डस कॉलनी, गिट्टीखदान) त्यांच्या ३० ते ४० साथीदारांसह येऊन तेथे दंगा करत आहेत़ त्यांनी चारही बाजुच्या वॉल कंपाऊंडचे गेट तोडून जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न चालविल्याचेही समर्थने जैन यांना सांगितले़ त्यामुळे त्यांनी आपल्या काही नातेवाईक तसेच सहका-यांना तेथे पाठवून पोलिसांना फोन केला़
घडनेच्या वेळी धनंजय चोपडे याने आरोपींच्या गुंडगिरीची मोबाईलमध्ये व्हिडीओ शुटींग करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्याच्यावर दंड्याने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले़ तोडफोड, आरडाओरड, शिवीगाळ अन् सिनेस्टाईल कब्जा मारण्याच्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला़ दुपारी २़३० पर्यंत हा प्रकार घडला त्यानंतर गिट्टीखदान पोलीस तेथे पोहचले़ त्यांनी जैन यांचे सुरक्षा रक्षक, कर्मचारी तसेच कब्जा करण्याचा प्रयत्न करणारे कमलेश चौधरी आणि साथीदारांपैकी काहींना ठाण्यात नेले़