Home Breaking News विमानतळावर शारजाहून आलेल्या १०० प्रवाशांचे गुहविलगीकरण

विमानतळावर शारजाहून आलेल्या १०० प्रवाशांचे गुहविलगीकरण

0
विमानतळावर शारजाहून आलेल्या १०० प्रवाशांचे गुहविलगीकरण
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपुर – कोरोनाच्या येणा-या नविन व्हेरिएंट ओमायक्रॉन विषाणूच्या पाश्र्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार तब्बल पावणे दोन वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी शारजाह येथून आलेल्या एअर अरेबियाच्या विमानातील १०० प्रवाशांची मनपातर्फे आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली़ चाचणीदरम्यान प्रवाशांची धाकधूक वाढली होती़ तीन तासांनंतर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्र्वास सोडला़ त्यांना सात दिवस गृहविलगीकरणात पाठविण्यात आले़ यादरम्यान, या सर्वांवर मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष ठेवणार आहेत़
एअर अरेबियाचे जी ९-४१६ शारजाह-नागपूर विमान नागपूर विमानतळावर सकाळी ६़४५ वाजता उतरले़ विमानात ९५ प्रवासी, ५ लहान मुले आणि चार कॅबिन क्रुसह एकूण १०५ लोक होते़ सर्व लोक प्रवासी चाचणी करुन नागपुरात विमानतळावर सर्व प्रवाशांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली़ प्रवासी आल्यानंतर प्रारंभी त्यांना कस्टर क्लिआरन्समधून जावे लागले़ त्यानंरत प्रत्येकाची खासगी प्रयोगशाळेव्दारे आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली़ अहवाल येईपर्यंत तीन तास त्यांना विमानतळावर थांबावे लागले़ त्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली तसेच रविवारी नागपुरात पोहोचेल्या विदेशी प्रवाशांना सात दिवस गृहविलगीकरणात राहिल्यानंतर पुन्हा आरटी पीसीआर चाचणी करावी लागणार आहे़