लसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक

258
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – कोरोनाच्या दुस-या लाटेने केलेल्या धुमाकूळ घातल्यानंतर आता परिस्थिती नियंत्रणात आली होती व जनजीवन पूर्वपदावर येत होते़ अशातच आता ओमायक्रॉन देशात धडकला असून त्याची धास्ती अवघ्या देशातच पसरली आहे़ असे असतानाच कोरोनाला मात देण्यासाठी फक्त आणी फक्त लसीकरण हेच महत्त्वाचे शस्त्र असल्याने शासनाकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे़ लस घेणा-यांकडून पुढील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नसते़ यामुळेच शासनाकडून लसीचे दोन्ही डोज घेणे आता बंधनकारक केले जात आहे़ शिवाय ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्यासाठीही काही निर्बंध लावण्यात आले आहेत़ राज्य शासनाकडून निर्बंध लावले जात असतानाच जिल्हा प्रशासनाकडूनही काही निर्बंध लावून कोरोनाचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ यामुळेच आता प्रवासासह खरेदीसाठीही लसीकरण करणे गरजेचे झाले आहे़
रेल्वे,बसेस च्या प्रवासासाठीही आता दोन्ही डोज घेणे आवश्यक आहे़ प्रवासादरम्यान कोरोना बाधितपासून सहप्रवासी व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते़ शिवाय लसीकरण झालेल्या व्यक्तीपासून संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण होत नसल्याने अभ्यासातून सिध्द झाले आहे़ यामुळेच आता शासनाने लसीचे दोन्ही डोज घेतलेल्या व्यक्तीलाच बस तसेच रेल्वेमध्ये प्रवासाची मुभा दिली आहे़ यासाठी प्रवास करताना लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नागरिकांना बाळगणे गरजेचे झाले आहे़

  • मोठे होटेल आणि मॉलमध्ये लसीचे प्रमाणपत्र गरजेचे

प्रवासादरम्यान कोरोना संसर्गाचा धोका असतानाच मॉलमध्येही नागरिकांच्या संपर्कात येउन हा धोका टाळता येत नाही़ हेच कारण आहे की, शासनाने मॉलमध्ये, मोठे होटेलमध्ये लसीचे दोन्ही डोज घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्याचे निर्बंध लावले आहेत त्यासाठी लसीचे प्रमाणपत्र किंवा डिजीटल कार्ड दाखवून आता व्यक्तींना प्रवेश दिला जात आहे़ म्हणजेच, खरेदीसाठीही लसीकरण गरजेचे आहे