महापरिनिर्वाण दिना निमीत्त आढावा बैठक

197
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – शुक्रवार  दि. ०३/१२/२०२१ रोजी पोस्टे सक्करदरा येथे येत्या ०६ डिसेंबर २०२१ रोजी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमीत्ताने पोस्टे हददीतील बौध्द विहार व  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्या पदाधिकारी यांची पोलीस स्टेशन सक्करदराचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. धनंजय पाटील सरांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली़ सदर बैठकीत महापरिनिर्वाण दिवसा निमीत्य बौध्द विहार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ घेण्यात येणा-या कार्यक्रमाबाबत चर्चा करण्यात आली़ तसेच बौध्द विहाराजवळील असलेल्या परीसरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला़ त्यासंबंधाने त्यांना कुठलीही घटना घडल्यास पोलीसांना कळविण्यात सांगण्यात आले़ शक्य असल्यास बौध्द विहार परिसरात सि़ सि़ टी़ व्ही़ कॅमेरे लावण्याबाबत सांगण्यात आले़ सदर बैठकीत श्री. राजेश वाघमारे, मंगेश वासनिक, राहुल नगरारे, विठ्ठल फुलझेले, राहुल जारोंडे, श्रीमती यशोदा दखने, श्रीमती रंजना कोसारे, श्रीमती शोभा बेले असे १० ते १२ महीला / पुरुष पदाधिकारी आणि पो़ स्टे़ सक्करदरा, गोपनीय शाखेचे सहा़ फौजदार श्री मधुकर टुले, ना़ पो़ शि़ श्री पंकज कुुंभलकर हजर होते़