कोरोनाच्या नव्या येणा-या व्हेरिएंटमुळे झाडीपट्टीतील मनोरंजनाचे कार्यक्रम धोक्यात

216
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • कलाकारांवर उपासमारीचे संकट

गोंदिया – दिवाळी सण संपताच या परिसरात झाडीपट्टी रंगभूमी अंतर्गत स्थानिक कलाकारांच्या समन्वयातून गावागावांत मंडई उत्सवाला सुरुवात केली जाते़ या निमित्ताने नाटक, तमाशा, हंगामा अशी विविध मनोरंजनाची कार्यक्रम आयोजित केली जातात़ मागील गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती़
अलीकडे कोरोनाचा संसर्ग कमी होताच या परिसरात नाटक, तमाशा, हंगाम यांसारख्या मनोरंजनातून कार्यक्रम करण्यास शाशनाने मंजुरी देणे सुरु होते़ त्यामुळे प्रत्येक गावातून कार्यक्रमाची रेलचेल दिसून येत होती़ परंतु आता कोरोनाच्या नव्या संकटामुळे मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यावर बंदी येणार अशी भीती निर्माण झाली आहे़ यामुळे कलाकारांच्या रोजगारावर पाणी फिरणार हे निश्र्चित़
कोरोनाचा संसर्ग कमी होताच साडीपट्टी रंगभूमी पूर्ण ताकदीसह गावागावांत कार्यक्रम सादगीकरण करण्यात आली़ परंतु अलीकडे ओमायक्राँन या नव्या कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासन पुन्हा कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्याच्या शक्यतेमुळे नाटक, तमाशा, हंगामा, दंडार आदी समाज प्रबोधनात्मक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमामधून कलाकौशल्य सादर करणा-या हजारो कलाकारांवर उपासमारीचे संकट येण्याची भीती निर्माण झाली आहे़