विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – मागील दीड वर्षापासून एसटी बसेस धूळ खात बसलेले आहे तसेच नुकसान ही होत आहेत़ एसटीला मेन्टेनन्ससाठी दर महिन्याला हजारों रुपयांची गरज भासते़ एसटी कर्मचा-यांच्या होत असलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे़ एसटी प्रशासनाचेही कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे़ परंतु, त्याशिवाय एसटी बसच्या व्यवस्थापनाची चिंताही व्यक्त करण्यात येत आहे़ अनेक डेपोत बसेस उभ्या करुन धूळ खात बसले आहेत़ एसटी कर्मचारी संपावर आहेत़ यात मेकॅनिकचा समावेश आहे़ त्यामुळे एसटी प्रशासनासमोर बस चांगल्या स्थितीत ठेवण्याची चिंता आहे़
एसटीच्या अनेक बसची अवस्था आधीच बिकट आहे़ आधीच प्रवाशांसाठी बसची अवस्था चांगली नाही़ बसची अवस्था जर्जर झाली आहे़ बसेसच्या सिट तुटलेल्या असल्यामुळे बसमधील स्पेअर पार्ट हलतात़ लहान समस्या निर्माण होतात़ त्यामुळे बसची स्थिती चांगली करण्याची गरज आहे़ बसमध्ये प्रवासी असल्यास त्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो़ बसची स्थिती खराब असल्यामुळे या बसमध्ये प्रवास करण्यासाठी दुस-या जिल्ह्यातील प्रवासी संकोच करतात़

प्रवाशांच्या मते, बसची नियमित देखभाल करावे तसेच बसची अवस्था चांगली करण्याची गरज आहे़ काही अश्या बस आहेत ज्यांना चांगल्या पध्दतीने रिपेअर करण्याची गरज आहे़

 

You missed