विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर

नागपुर – वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवीत असाल तर सावधाऩ आता जर असे कराल तर तुमच्या खिशाला भारी पडेल, सोबतच तीन महिन्यासाठी वाहन परवानही निलंबित होईल़ महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे़ परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १000 रुपये दंड होता, आता ५००० रुपये करण्यात आला आहे़ वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास पूर्वी सरसकट दंड आकारला जात होता़ परंतु आता प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळा दंड आकारला जाणार आहे़ मोटार वाहन कायद्यात २०१९ मध्ये बदल करीत दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली होती़ त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठविली़ दंडाच्या रकमेत वाढ झाल्याने काही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती़ आता कुठलीही चर्चा न करता दंडाच्या काही रकमेत वाढ तर काहीमध्ये कठोर तरतूद करण्यात आली आहे़ १ डिसेंबर २०२१ रोजी याची अंमलबजावणी करण्याचे आदेशही आरटीओ अधिका-यांना देण्यात आले आहे़ नव्या दंडामुळे बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी मदत होईल, असे अधिका-यांचे म्हणणे आहे़

  वाहन दंण्डात्मक नियमावलीत बदल : पूर्वी : आता
१) परवाना नसताना वाहन चालविणे १००० : ५०००
२) फँन्सी नंबरप्लेट किंवा रिफ्लेक्टर्स नसणे ५०० : पहिल्यांदा १०००, दुस-या गुन्ह्यासाठी १५००
३) विना तिकीट प्रवास : तिकिटाच्या दुप्पट रक्कम ५००
४) अनधिकृत व्यक्तीला वाहन चालविण्यास दिल्यास : १००० : ५०००
५) पीयूसी नसल्यास : ५००: १,०००
६) वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (दुचाकी व तीनचाकी) : ५०० : १०००
७) वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (ट्रँक्टर) ५०० : १५००८) वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (कार) ५०० : २०००
९) वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास (जड वाहन) : ५०० : ४०००
१०) वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (दुचाकी व तीनचाकी) : ५०० : १०००
११) वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (कार ): ५००: २०००
१२) वाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यास (जड वाहन) ५०० : ४०००
१३) वाहन चालविण्यास अपात्र असताना वाहन चालविल्यास : ५०० : १०००, दुस-यांदा गुन्हेसाठी २०००
१४) शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे : ५०० : पहिल्या गुन्ह्याकरिता ५००० दुस-या गुन्ह्याकरिता १००००
१५) वाहनात बदल केल्यास : १००० : प्रत्येक बदलासाठी २०००
१६) नोंदणी न करता वाहन चालविल्यास : ५००० : १०,०००
१७) विमा नसताना वाहन चालविल्यास : १००० : पहिल्या गुन्ह्याकरिता २००० दुस-या गुन्ह्याकरिता ४०००
१८) वाहनाबाहेर माल आल्यास : २००० : २०,०००
१९) सीटबेल्ट : १००० : २००
२०) पोलिसांच्या सूचनेचे पालन न केल्यास, पळून गेल्यास, पळून गेल्यास : ५०० : ७५०
२१) वाहनाचे परमीट नसल्यास : १००० : १०,०००

You missed