Home Breaking News शहरातील शाळा १० डिसेंबर नंतर होणार सुरु तर ग्रामीणमध्ये मिळाली मंजुरी

शहरातील शाळा १० डिसेंबर नंतर होणार सुरु तर ग्रामीणमध्ये मिळाली मंजुरी

0
शहरातील शाळा १० डिसेंबर नंतर होणार सुरु तर ग्रामीणमध्ये मिळाली मंजुरी
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – राज्य शासनाने १ डिसेंबरपासून शहरातील १ ते ७ व ग्रामीण भागातील १ ते ४ चे वर्ग सुरु करण्यास मंजुरी दिली़ पण, कोरोनाचा ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा जगातील काही देशांमध्ये धोका वाढल्याने आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांनी शाळा सुरु करण्यासंदर्भात सावधगिरी बाळगली आहे़ त्यामुळे नागपूर शहरात मनपा आयुक्तांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेऊ असे स्पष्ट केले आहे़ तर, ग्रामीणमध्ये शाळा सुरु करण्याची परवानगी जिल्हाअधिका-यांनी दिली आहे़ नागपूर ग्रामीणमध्ये सुरुवातीला ८ ते १२ वर्ग सुरु करण्याला परवानगी दिली होती़ त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ५ ते ७ वर्ग सुरु झाले़ आता शासनाने १ ते ४ चे वर्गही सुरु करण्याचा निर्णय घेतला़ पण, शहरी भागात व महापालिकेच्या हद्दीत असणा-या ८ ते १२ वर्गाच्याच शाळा प्रत्यक्षात सुरु झाल्या़ अजूनही १ ते ७ वर्गाच्या शाळा सुरु होउ शकल्या नाही़ सोमवारी संपूर्ण शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले़ त्यामुळे शिक्षणाधिका-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी व महापालिकेच्या आयुक्तांकडे शाळा सुरु करण्याच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविले़
महापालिका आयुक्तांनी शाळा सुरु करण्याबाबत सावध भूमिका घेतली़ त्यांनी स्पष्ट केले की, सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लक्षात घेता वर्ग १ ते ७ च्या शाळा १० डिसेंबर पर्यंत सुरु होणार नाही़ यानंतर परिस्थितीचा आढावा घेउन त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल़ मात्र जिल्हाधिका-यांनी शाळा सुरु करण्यास सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामीण भागातील १ ते ४ च्या शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली़ शाळा सुरु करण्यासंदर्भात ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचविल्या आहेत़ त्याची अंमलबजावणी शळांकडून करुन घेण्यात येईल़