तरुणांच्या आत निर्माण व्हावे प्लास्टिक विरोधात जनजागृती, युवकाने पायी भ्रमण करुन १६ राज्यांचा प्रवास करुन दिले उदाहरण़़

207
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – कामठीचा १९ वर्षाचा युवक मागच्या वर्षी देशभ्रमणाला निघाला आणि ते पण पायी़ हे खरे, मात्र, या तरुणाने आतापर्यंत १६ राज्यांचा प्रवाससुध्दा पूर्ण केला आहे़ प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी कसा घातक ठरु शकते तसेच त्याचे दुष्परिणाम कसे भोगावे लागणार, भावी पिढीसाठी प्लास्टिकची समस्या किती गंभीर राहू शकते यावर जनजागृती करण्यासाठी तो देशभर पायी प्रवास करतोय़ युवकाचे नाव रोहन रमेश अग्रवाल आहे तसेच तो कामठीचा राहणारा आहे़ रोहनने आतापर्यंत उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, चंदीगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तामिलनाडू, पाँडेचेरी, केरळ, कर्नाटक, गोवा आणि नागपूरवरुन सडक-अर्जुनी असा २ हजार किलोमीटरचा प्रवास पायी केला तर २० हजार किलोमीटर कोणी लिप्ट देऊन वाहनातून प्रवास केला़ बीक़ाँम़ व्दितीय वर्षाला शिकत असताना त्यांनी आपल्या देशभ्रमणाची बाब आई-वडिलांना सांगीतली़ तेव्हा त्यांनी त्याला वेड्यात काढले़ पण रोहनने आपल्या मनात गाठ बांधून व घरुन अडीच हजार रुपये घेऊन देशभ्रमण करण्यासाठी निघाला़
रोहन सांगतो देशात अजूनही खूप माणुसकी शिल्लक आहे़ अन्यथा माझे भ्रमण थांबले असते, अनेक लोक आपल्याला मदतीला भेटतात, कोणी सहकार्य करतो अन्यथा माझ्याजवळ काही नाही़ भावी पिढीमध्ये प्लास्टिक विरोधात जनजागृती निमार्ण व्हावे , पुढे समस्या किती गंभीर राहू शकते असे सांगितले़ अनेक सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांनी त्यांच्या भेटी घेतल्या़ तसेच येथून आता रशियामधील सायबेरिया येथे जाण्याचा मानस व्यक्त केला़