कस्तुरबा भवनात कुणबी समाजाचा मेळावा संपन्न….

97
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर 

नागपुर – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय कुणबी महासभेचा राष्ट्रीय मेळावा बजाज नगरातील कस्तुरबा भावनात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोपाळचे राष्ट्रीय अध्यक्ष एल. पी. पटेल हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लोक विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. रमेश ठाकरे हे होते. व्यासपीठावर लोक विद्यापीठांचे महासंचालक डॉ. मंगेश देशमुख, तैलिक महासंघाचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रकाश घवघवे, रमेश राजूरकर (वरोरा) कुणबी सेनेचे संस्थापक दत्तात्रय ठाकरे, व डॉ. आर.डी. गावंडे हे उपस्थित होते. याप्रसंगी सर्वश्री डॉ. प्रकाश घवघवे, श्रीमती रंजना हाडके, सौ. मीनाक्षी गतफणे यांचा सन्मानपत्र व पुस्तके देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या पुढाकाराने संपादित झालेल्या क्रांतिरत्न ह्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. याप्रसंगी  सर्वश्री जितेंद्र नवनीत, डॉ.अमोल हाडगे, प्रियांका हाडगे, श्याम डहाके यांनी सुगम संगीताचा कार्यक्रम सादर केला. तीन तास चाललेल्या कार्यक्रमाची सांगता अखिल भारतीय महासंघाचे सचिव प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांच्या आभाराने संपन्न झाली.