हिमांशू युपकुमार पंचबुद्धे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पूर्व व पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष पदावर निवड…

385
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुरराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी 21 नोव्हेंबर रोजी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पूर्व व पश्चिम विभागाच्या उपाध्यक्ष पदी हिमांशू युपकुमार पंचबुद्धे यांची निवड करून त्यांना कृषी विभागात नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मान्यते नुसार केली आहे. विभागाचे उपाध्यक्ष हिमांशू पंचबुद्धे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांना कृषी विभागाच्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातूनच पक्ष संघटना मजबूत करतील व पक्षांचा झेंडा कृषी विद्यापीठावर लावतील व पक्ष संघटन वाढीचे काम करतील. अशी अपेक्षा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी दिलेल्या नियुक्ती प्रमाणपत्रात व्यक्त केली आहे. या नियुक्तीचे श्रेय हिमांशू पंचबुद्धेनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवा नेते ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नागपूर शहर अध्यक्ष दुणेश्वर पेठे, विभागीय अध्यक्ष आशिष आवळे, विनोद दादा भांगे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष कृषी राहुल दादा कांबळे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर आदींना दिले आहे.