देशातील ७० टक्के भारतीयांना संविधानाचे फायदे आज देखील मिळत नाही….

173
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – संविधान निर्माताने संविधानात जि संकल्पना मांडली होती. आजपण पुर्णपणे होताना दिसत नाही, कारण या देशातील सत्तर टक्के लोकांना संविधानाचे फायदे मिळत नाही. त्याचमुळे संविधानाची अंमलबजावणी अधूरी आहे अशी प्रांजळ टिका नारायण बागडे यांनी व्यक्त केली. ते आंबेडकरी विचार मोर्चा च्यावतीने धंतोली यशवंत स्टेडियम येथील कार्यालयात संविधान अंमलबजावणी या विषयावर चर्चा सत्रात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादाराव पाटील हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून अँड. सुरेश घाटे, नामदेवराव निकोसे, के.डी कांबळे, प्रकाश कांबळे, कल्पना कुंभारे, सुरेश कपूर, धर्मा बागडे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश दुपारे यांनी केले तर आभार मामा मेश्राम यांनी मानले.

याप्रसंगी हंसराज उरकुडे, प्रजोत कांबळे, रामभाऊ वाहणे, सुभाष बढेल, राजु पांजरे, अजय तायडे, राजलता बागडी, माया आढाव, के.एस.पानतावणे, शेखर वाघमारे, दामुदादा कावरे, अविनाश कांबळे, सुनिल बोरकर, मनिष कांबळे, अविनाश शेंडे, किशोर वासनिक व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.