नाना पटोलेंच्या नेतृत्वात गोदिंयात काँगे्रस ने बाईक रैली काढत केले शक्तिप्रदर्शन

136
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • के्रन च्या साह्याने गळ्यात टाकली ५० फुट लांब हार

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यात काँगे्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आज भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याचे निमित्ताने जिल्हा कांगे्रस व्दारे गोंदिया शहरात बाईक रैली काढत शक्तिप्रदर्शन करण्यात आले तर शहराच्या मुख्य जयस्तंभ चौकात के्रन च्या साह्याने ५० फुट लांब हार नाना पटोलें च्या गळ्यात टाकण्यात आले असून आगामी निवडणूका लक्षात घेता नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तर ज्या नवीन लोकांनवर जिल्ह्याचा पदभार देण्यात आला अश्या लोकांचा या वेळी सत्कार करण्यात आला़ नाना पटोले यांनी आपल्या भाषणातून मोदीं सरकार वर शब्दाचे बाण सोडले तर कंगना वर देखील नानानी भाष्य करायला सोडले नाही़

  • नाना पटोले पुढे म्हणतात कंगना राणावत चे जे विचार आहेत ते आरएसएस च्या विचारसरणीने पे्ररित आहेत त्यामुळेच आरएसएस ने २०१४ पर्यंत भारतीय तिरंगा आपल्या संघ मुख्यालयात फडकविला नाही़
  • महाविकास आघाडीचे सहकारी पक्षाचे नेतेच काँगे्रस च्या मागे ईडी लावण्याचे काम करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी आज गोंदिया मध्ये केला़
  • अधिवेशनात नागपुरातच व्हावे आणि तीन आठवळे चालावे ही काँगे्रस ची भूमिका राहील असे व्यक्तव्य नाना पटोले यांनी केले.
  • पेट्रोल आणि डिझेल चे दर महाराष्ट्र सरकारने कमी करावे ही काँगे्रस ची भूमिका आहे मात्र तीन पक्षाचे सरकार असल्याने अडचण येत आहे़