
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपुर :-संविधान चौकातील, संविधान दिनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर शहरा च्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी, संविधान महोत्सव दिनानिमित्त पीरिपा नागपूर शहराचे अध्यक्ष अरुण गजभिये यांच्या हस्ते संविधान चौक नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून मानवंदना करण्यात आली.लगेच पीरिपाचे कार्यकर्त्यांनी संविधान दिनी भारताचे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानाची शपथ घेण्यात आली. यावेळी पक्षाचे बाळूमामा कोसमकर, कैलास बोंबले, प्रकाश मेश्राम, अजय चव्हाण, कुंदन उके, सुरेश बोंदाडे, विनोद पाटील, सिद्धार्थ सोमकुवर, इंजिनियर अजय वासनिक, रमेश गेडाम, सुनील कांबळे, सी.जी.रामटेके, गुरुजी मोरेश्वर, दुपारे, सुदेश नंदागवळी, कृषी नारा सोमकुवर, प्रभाकर बागडे, इत्यादींनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले .

