Home Breaking News नगरपंचायत निवडणुकांनतर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचा लागणार कस

नगरपंचायत निवडणुकांनतर जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचा लागणार कस

131 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी अ‍ॅक्टिव्ह मोडवर

गोंदिया – राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १०५ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला़ यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी या चार नगरपंचायतींच्या निवडणुका होउ लागले आहेत़ बुधवारी निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुरुवारपासून जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी अ‍ॅक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र बघायला मिळत आहे़ नगरपंचायत निवडणुकानंतर जिल्ह्यात नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होउ लागल्या आहेत़ त्यामुळे या निवडणुकीत चांगला रिझल्ट दिल्यास त्याचेच पडसाद जिल्हा परिषद निवडणुकीत उमटू शकतात़ नगरपंचायत निवडणूक ही अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, गोरेगाव, देवरी या चार शहरांपुरती मर्यादित असली तरी या निवडणुुकीवर बरेच राजकारण अवलंबून आहे़ त्यामुळे मागील आठ ते दहा दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांचे नेते या चारही शहरांत तळ ठोकून बसल्याचे चित्र आहे, तर राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेत्यांचे दौरेसुध्दा वाढले आहेत़
सभा, मेळावे आणि बैठकांमधून आपल्या पक्षाचा कोणता उमेदवार तगडा राहू शकतो याचा कानोसा घेतला जात आहे़ कोरोनामुळे नंगरपंचायतच्या निवडणुका वर्षभर लांबविण्यात आल्या होत्या़ त्यातच राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायतच्या निवडणुका जाहीर केल्याने गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापले आहे़ निवडणुका जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तिकिटासाठी पक्षाकडे फिल्डिंग लावल्याचे चित्र आहे, तर सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक ज्येष्ठ नेते आणि आमदारांवर या निवडणुकीची जबाबदारी सोपविली आहे़ त्यामुळे हे सर्वच आता अ‍ॅक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र आहे़