विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
गोंदिया/आमगाव – भारतीय संविधान दिवसाचे औचित्य साधून आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा़ नरेशकुमार माहेश्र्वरी माजी म्हाडा सभापती यांचे अध्यक्षते खाली विविधतेने नटलेल्या देशाच्या एकतेचा आधार आणि जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचे आत्मा असलेल्या संविधानाचे शिल्पकार शिल्पकार विश्र्वरत्न डाँ़ बाबासाहेब आंबेडकर यांना आंबडेकर चौक आमगाव येथे बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण व पुष्पहार अर्पण करुन भारतीय संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले व संविधान दिवस साजरा करण्यात आले़
यावेळी प्रामुख्याने कमलबापू बहेकार, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, जियालाल पंधरे, यादव मेश्राम, कविता रहांगडाले, जयश्री पुंडलकर, लक्ष्मीताई येडे, संतोष श्रीखंडे, सुभाष यावलकर, विनोद कन्नमवार, तुलेन्द्र कटरे, प्रमोद शिवणकर, संजय रावत, संतोष रंहागडाले, बबलू बिसेन, रमण डेकाटे, प्रल्हाद गाते, भारत पागोटे, सुमित कन्नमवार, स्वप्नील कावडे, पुरुषोत्तम चुटे, राकापाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन व आभार तालुका सचिव संतोष श्रीखंडे यांनी केले.

