Home नागपूर संविधान दिनी आशा वर्कर्सचे धरणे आंदोलन

संविधान दिनी आशा वर्कर्सचे धरणे आंदोलन

0
संविधान दिनी आशा वर्कर्सचे धरणे आंदोलन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर
  • आशां चा कोविड लसीकरणाच्या कामावर बहिष्कार.

नागपूर – नागपूर महानगर पालिकास्थित शहरी आशा वर्कर्स यांना सूचना आहे कि, नागरिकांचे लसीकरण करून घेण्याचे दृष्टीने आशा वर्कर वर दवाब बनवून किंवा २०० रू. रोज देण्याचे शाब्दिक आश्वासन देऊन कवच कुंडल व हर घर दस्तक योजनेचे नाव देऊन काम करून घेतले. परंतु सध्या मोबदला मागितला असता देऊ शकत नाही. असे उत्तर मिळत आहे. हा आशा वर्कर वर मोठा अन्याय आहे.

नवीन आशा वर्कर्स यांची भरती करतांना मोबदला बद्दल सांगून कोरोनाचे संकटकाळी सर्व प्रकारचे काम करून घेतले. इंजक्षण प्रशिक्षण बाबत वेळोवेळी विचारणा केली असता आता जास्त लोकांना बसवून प्रशिक्षण घेता येणार नाही. परंतु राज्याचा निधी आल्यानंतर आम्ही पूर्ण निधी देऊ असे शाब्दिक आश्वासन मनपाचे एम ओ एच डॉ.चीलकर यांनी देऊन मी बोललो नाही. असे उत्तर देऊन आम्ही वाढीव मोबदला देऊ शकत नाही. असे सांगण्यात आल्याने प्रती आशा वर्कर यांचे एप्रिल २०२१ पासून २०००० रू. नुकसान झाले आहे. आरोग्य वर्धीनी योजनेचा १००० रू. महिना प्रती आशा प्रमाणे निधी राज्याकडून २०१९ पासून आला. परंतु आरोग्य वर्धीनी प्रशिक्षण घेण्याचे टाळून आशा वर्कर कडून काम करून घेण्यात येते. परंतु प्रशिक्षण देताना फक्त चालू महिन्यापासून फक्त ३०-३० आशा वर्कर चे प्रशिक्षण घेतल्या जात आहे. ९५५ आशा वर्कर्स यांचे प्रशिक्षण केव्हा होणार ? हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे पूर्ण प्रशिक्षण झाल्याशिवाय १००० रू. महिना देता येणार नाही. असे उत्तर मिळत आहे. नवीन आशा वर्कर्स यांचे आता पर्यंत एचबीएनसी प्रशिक्षण न झाल्यामुळे लाभार्थ्यांना सेवा देऊन सुद्धा प्रती प्रसूती २५० रू. आशा वर्कर मिळू शकत नाही. हा नियम असताना प्रशिक्षण का देण्यात येत नाही. हा चिंतेचा विषय आहे. असेच काही समान विषय जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या ग्रामीण आशांचे आहेत. त्यामुळे आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू ) चे अध्यक्ष राजेंद्र साठेनी घोषणा केली की, २४ नोव्हेंबर पासून सर्व आशा वर्कर्स कोविड लसीकरण कामावर बहिष्कार टाकून २६ नोव्हेंबर रोजी ११ वाजे पासून संविधान चौकात धरणे आंदोलन करणार.