Home नागपूर निबंध स्पर्धेचे आयोजन

निबंध स्पर्धेचे आयोजन

95 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त मिशन आयएएस व महाराष्ट्र गांधी स्मारक निधी कस्तुरबा भवन बजाज नगर नागपूर च्यासंयुक्त विद्यमाने एका निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. निबंध स्पर्धेचा विषय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन व कार्य असा आहे. या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले निबंध दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत सुनील पाटील सचिव गांधी स्मारक निधी 349 कस्तुरबा भवन बजाज नगर नागपुर -10 या पत्त्यावर पाठवावे.

या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक देण्यात येणार असून सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना  सहभाग प्रमाणपत्र व स्पर्धा परीक्षेचे एक पुस्तक मिशन आयएएस तर्फे विनामूल्य देण्यात येणार आहे. या निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले निबंध पोस्टाने वरील पत्त्यावर पाठवायचे आहेत. निबंधसाठी शब्दमर्यादा हजार शब्दांची असून स्पर्धकांनी निबंधावर आपले पूर्ण नाव शाळेचे तसेच महाविद्यालयाचे नाव तसेच तसेच आपले आपला पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर लिहिणे गरजेचे आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी, नागपुरात दीक्षाभूमी परिसरामध्ये असलेल्या बजाज नगरातील कस्तुरबा भवनमध्ये संपन्न होईल. तरी विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेमध्ये बहुसंख्येने सहभाग घ्यावा. असे आवाहन यास्पर्धेचे संयोजक व मिशन आयएएसचे संचालक प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस 349 कस्तुरबा भवन बजाज नगर नागपूर.
98909 67003