Home Breaking News हिवाळी अधिवेशनबाबत करावी लागणार प्रतिक्षा, तारीख पुढे वाढण्याची शक्यता

हिवाळी अधिवेशनबाबत करावी लागणार प्रतिक्षा, तारीख पुढे वाढण्याची शक्यता

27 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – ७ डिसेंबरपासून नागपुरात नियोजित असलेल्या हिवाळी अधिवेशनाबाबत अद्यापही शासनाकडून ठोस निर्णय झालेला नाही़ त्यातच २५ नोव्हेंबरपासून विधिमंडळ सचिवालयाचे कामकाज नागपुरात सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे़ या पार्श्र्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार की नाही याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे़ मुंबई व नागपुरातील अधिका-यांनी यासंदर्भात  ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ ची भूमिका घेतली असून शासनाच्या निर्देशांकडे त्यांचे लक्ष लागले आहे़ येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याची घोषणा अगोदरच झालेली आहे़ परंतु कोरोनाची पार्श्र्वभूमी व इतर कारणांमुळे अधिवेशनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे़ काही अधिका-यांनी २० डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली आहे़ मात्र असे झाले तर केवळ काही दिवस अधिवेशन चालेल़ अशा स्थितीत कोट्यवधींचा खर्च करणे कितपत योग्य ठरेल यावरदेखील शासन – प्रशासनात मंथन सुरु आहे़ एकूण संभ्रम लक्षात घेता विधीमंडळ सचिवालयातील अधिका-यांनी शासन निर्णयाची प्रतीशा करण्याचे ठरविले आहे़ नागपुरातील अधिका-यांनादेखील तशा सूचना देण्यात आल्या आहेत़ अधिवेशन कधी व कुठे होणार याबाबत विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनादेखील नेमकी माहिती नाही़ राज्य शासनाचे निर्देश अद्याप आलेले नाहीत़ शासनाकडून निर्णय झाल्यावर त्याचे पालन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले़

७ डिसेंबरपासून नागपुरात अधिवेशन घेण्याचा निर्णय झाला तर प्रशासनाची प्रचंड धावपळ होईल़ आमदार निवास, रविभवन, नागभवन, देवगिरी, रामगिरी यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तयारीची कुठलीही कामे सुरु नाहीत़ जर अधिवेशन २० डिसेंबरपासून सुरु करण्याचे नियोजन झाले तरीदेखील तयारीसाठी २७ दिवसांचाच कालावधी मिळेल़ अधिवेशनाच्या कामासाठी होणारी तात्पुरत्या स्वरुपातील पदभरतीसुध्दा पुढे ढकलण्यात आली आहे हे विशेष़