
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपुर
गोंदिया – जिल्ह्यातील ३० केंद्रावरुन टीईटीची परीक्षा रविवारी दि़ २१ रोजी घेण्यात आली़ टीईटीचा पहिला पेपर सकाळी १०़३० ते १ वाजता दरम्यान होता़ येथील संत तुकाराम हायस्कूल या केंद्रावर पेपर देणा-या एका विद्यार्थिनीने ब्लूटूथ जा वापर करुन पेपर सोडविला़ त्या ब्लूटूथवरुन इतर परीक्षार्थ्यांनी गोंधळ घातल्यामुळे त्या मुलीला निलंबित करण्यात आले़ व तिच्या जवळील ब्लूटूथ जप्त करुन तो पेपरसह पुण्याला पाठविण्यात आला आहे़ संपूर्ण पेपर होईपर्यंत हा प्रकार कुणाच्याच लक्षात आला नाही़ पेपर सुटल्यावर बाहेर पडताना तिने ब्लूटूथ काढल्याने हा प्रकार घडला़ यावर सोबत असलेल्या परीक्षार्थ्यांनी तिचा पेपर रद्द करावा म्हणून गोंधळ घातला़ या परीक्षेतून तिला निलंबित करण्याची माहिती उप शिक्षणाधिकारी डी़एम़ मालाधरी यांनी दिला आहे़
टीईटीच्या ७५९१ विद्यार्थ्यांपैकी ६७३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे़ यात पहिल्या पेपरसाठी ४६२९ विद्यार्थ्यांपैकी ४१०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ व्दितीय पेपर २९६२ विद्यार्थ्यांपैकी २६३९ विद्यार्थ्यांनी दिला़ टीईटीच्या परीक्षेला ८५२ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे़ परिषदेच्या सूचनेनुसार सर्व केंद्राची व्हिडीओ शूटिंग करण्यात आली आहे़

