सालाई गोधनी प्रा. आ. केंद्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत, ग्रामस्थांनांना कधी मिळणार आरोग्य सुविधा

150
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • इमारत बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत केल्या नसल्याची माहिती उघडीस

आसोली/हुडकेश्वर – नागपूर ग्रामीण तालुक्यातील सालई गोधनी (काळडोंगरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला २०१३ मध्ये मंजुरी मिळाली़ कोट्यवधी रुपये खर्चून २०१७ मध्ये इमारतीचे लक्षवेधक बांधकामही पूर्ण करण्यात आले़ पण कधी तांंत्रिक कारणामुळे तर कधी श्रेय लाटण्याच्या अट्टाहासापोटी तर आता कोरोना संक्रमणामुळे सदर आरोग्य केंद्र आजही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने ही इमारत धूळखात पडलेली आहे़ विशेष म्हणजे अद्यापही सदर इमारत बांधकाम विभागाकडून आरोग्य विभागाकडे हस्तांतरीत केल्या नसल्याची माहिती आहे़
सालाई गोधरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तयार असूनही ग्रामस्थांना त्याचा आरोग्य लाभ मिळू शकत नाही़ गावात योग्य त्या आरोग्य सुविधा नसल्याने ग्रामस्थांना शहरात धाव घ्यावी लागत आहे़ गंभीर रुग्णास शहरात नेताना कधी कधी जीव देखील गमवावा लागतो़ तसेच खासगी रुग्णालयामधील खर्चाचा मोठा आर्थिक मूर्दंडही सहन करावा लागतो़ तेव्हा सदर प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु करुन गावक-यांना आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु करुन गावक-यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी नागपूर ग्रामीण काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विनोद मिसाळ यांनी केली आहे़ यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री, आरोग्य मंत्री, जि़ प़ अध्यक्ष, आरोग्य समिती सभापती मुख्य कार्यकारी अधिकारी जि़ प़ नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी नागपूर यांना निवेदनही सादर केले आहे़