Home नागपूर नागपूरच्या कार्तिक जैस्वालने “मिक्स मार्शल आर्ट सुपर फाईट” स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले़

नागपूरच्या कार्तिक जैस्वालने “मिक्स मार्शल आर्ट सुपर फाईट” स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले़

0
नागपूरच्या कार्तिक जैस्वालने “मिक्स मार्शल आर्ट सुपर फाईट” स्पर्धेत कांस्यपदक पटकाविले़
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – नागपूरचा कार्तिक जैस्वाल यांनी कांस्यपदक जिंकले़ १२ ते १४ या नोव्हेंबर दरम्यान दिल्लीच्या व्दाराका येथे पार पडलेल्या भारतातील पहिल्या “मिक्स मार्शल आर्ट सुपर फाईट” स्पर्धेत नागपूरच्या कार्तिकने कांस्यपदक पटकाविले़ आणि या स्पर्धेमध्ये भारतासह इतर देशातून आणि अफगाणिस्थान येथून संपूर्ण देशातील २०० फायटर सहभागी झाले होते़ या स्पर्धेतील कार्तिकने उत्तम प्रकारे कामगिरी केली़ त्यांनी दिल्लीच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले़ त्यांची बेंगलोर येथे १६ डिसेंबर ते १९ डिसेंबर या दरम्यान होणा-या चॅम्पियनशीप स्पर्धेकरिता कार्तिक जैस्वाल पात्र ठरलेला आहे़ एमएमए फायटर कार्तिक जैस्वाल हा मोहता कॉलेज ऑफ सायन्समध्ये व्दितीय वर्षात शिकत आहे़ रवि मेंढे सरांकडे इन्सपायर जिम मध्ये सध्या सराव करतो आहे़
अधिक माहिती करिता संपर्क साधू शकता.

कार्तिक जयस्वाल
मो़ – ९०२२८०६६७९