
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
तुळशी
बहु गुणकारी । आयुर्वेदी भारी ।
असावीच दारी । ही तुळशी ।।
तुळशी महत्व । प्राणवायू सत्व ।
टिकवा अस्तित्व । घरोघरी ।।
वृंदावना वरी । हवा शुद्ध करी ।
ऑक्सिजन भरी। सभोवती।।
औषधी ही फार। पळवी आजार ।
पर्ण अर्क बार । बहुगुणी ।।
लहानच मूर्ती । परी खूप कीर्ती ।
तिच्यामुळे स्फूर्ती । तनी, मनी ।।
चैतन्य ही देते । अंगणी शोभते ।
आरोग्य लाभते । परिवारा ।।
फुलू द्या ही राणी । रोज घाला पाणी ।
अभंगाची गाणी । युवा वाणी ।।
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
जिल्हा:- सोलापूर
8275171227

