Home गोंदिया पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा, तीन जणांना अटक

पोलिसांचा जुगार अड्डयावर छापा, तीन जणांना अटक

137 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – तिरोडा पोलिसांनी कार्यवाही करत जुगार अड्डयावर छापा टाकून तीन जणांना अटक केली आहे़ या कारवाईत पोलिसांनी एक लाख चार हजार ७२५ रपयांचा माल जप्त केला आहे़ बुधवारी( दि़ १७) रात्री ९ वाजण्यादरम्यान ठाणेदार योगेश पारधी व त्यांचे सहकारी शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी महात्मा फुले वॉर्डातील एका घरातील मागील खोलीत काही व्यक्ति मोबाईलवर सट्टयाचे आकडे लिहून पैसे घेउन हारजीतचा जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली़ यावर पोलिसांनी तेथे छापा टाकला असता आरोपी संदीप चंदनदास गजभिये (रा़ महात्मा फुले वॉर्ड), सुरेश चमरु घोडमारे (रा़ संत कवरराम वॉर्ड) व डेव्हिड रविकिरण बडगे (रा़ आंबेडकर वॉर्ड) मिळून आले़ पोलिसांनी त्यांच्याजवळून ४ मोबाईल, २ कॅलक्युलेटर, १ लाकडी टेबल, २ खुर्ची, ५ नग पेन, एक हजार रुपये रोख, दोन दुचाकी व सट्टाच्या आकड्याच्या हिशेबाचे कागद असा एकूण एक लाख चार हजार ७२५ रुपयांचा माल जप्त केला आहे़ या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून आरोपी विरुध्द कलम महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ५ सहकलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पारधी, महिला पोलिस उपनिरीक्षक राधा लाटे, नायक पोलिस शिपाई श्रीरामे, बर्वे, वाढे, चालक पोलिस शिपाई प्रशांत कहालकर यांनी केली आहे़