Home क्राइम जगत दगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली

दगडाने ठेचून केली मित्राची हत्या, स्वत:च केली कबुली

289 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपुर – दारु पिताना वाद निर्माण करून एका युवकाने त्याच्या मित्राची दगडाने ठेचून हत्या केली़ ही घटना बुधवारी दुपारी नंदनवन परिसरातील सेंट झेवियर्स स्कूलच्या जवळ घडली़ आरोपीने ठाण्यात येउन स्वत:च कबुली दिली आहे़ मृतकाचे नाव दिनेश विनायक राजापुरे (४०, रा़ दर्शन काँलनी) , तर अतुल हेमराज शिवणकर (२३ रा़ श्रीनगर) असे आरोपीचे नाव आहे़ दोघेही पेंटिगची कामे करतात़ अतुल दिनेशला भाउजी म्हणत होता़ दोघेही सोबत काम करीत होते़ दिनेशला दारुचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी दोन मुलांसह वेगळी राहत होती़ बुधवारी दोघांनाही पेंटिगच्या कामाचे १ हजार रुपये मिळाले़ दोघांनी दारु विकत घेतली व सेंट झेवियर्स स्कूलजवळील झुडपात पीत बसले होते़ दरम्यान, ३ च्या सुमारास दोघांमद्ये वाद निर्माण झाला अतुलच्या सांगण्यानुसार दिनेशने त्याला शिवीगाळ केली व थापडही मारली़ त्यामुळे संतप्त झालेल्या अतुलने त्याच्या डोक्यावर दगडाने वार केला़ यात दिनेशचा जागेवरच मृत्यू झाला़ यानंतर अतुल घटनास्थळावरुन थेट नंदनवन ठाण्यात पोहोचला़ त्याने पोलिसांना मी माझ्या मित्राचा खून केला, म्हणत खुनाची कबुली दिली़ पोलीस अतुलला घेउन घटनास्थळावर पोहचले़ पोलिसांना दिनेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात पडलेला दिसला़ अतुलला पोलिसांनी अटक करुन दिनेशचे पार्थिव मेडिकलला रवाना केले, व आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला़